Tag Archives: वधू वर मेळावा

कंटाळ येतो आता !!!

Standard

“राणी……………………………. राणी …………………..!!!” च्या गजराने माझी संडे मॉर्निंग झोप उडाली |

मला हे गजर काही अनोळखी नाही| एस्पेशिअली जेव्हा ते दोन वेळा खेचून बोल्ले गेलेलं असता | मी फटकन उठून चादर घडी करून बाथरूम कडे धाव घेतला नोइंग मम्मी तापलेली आहे | 
 
१५ मिनिटात सगळं आवरून मी लिविंग रूम मधे हजेरी लावली | बघते तर काय आमचं होम मिनिस्टर , सेक्युरिटी ऑफिसर आणि गुप्तचर विभाग एका गोलमेझ सम्मेलना साठी बसलेले होते | नेहमी सारखी ती बीन बग हॉट सीट सारखी माझी वाट पाहत उभी होती , मी खच करून बैसले आणि जसा एखादा शेल स्नेल ला सामावतं तसा त्याने मला सामावून घेतलं | 
 
मम्मी नी लेप्टोप ऑन केला आणि उघडल्या त्या नको नकोश्या वाटणाऱ्या matrimonial साईट्स | अन मग बघता बघता तिने सगळ्या साईट्स च्या स्टेट्स काढल्या अन सुरु झाली| I tell you, मला झालेल्या गोष्टीन वरून छळलेल अजिबात आवडत नाही | त्यात मम्मी पप्पांना घेऊन बसली म्हणजे मी इमोशनली ब्लेक्मेल्ड and i just dont have any rights to argue.
 
मग सुरु झाली वन वे ट्रेफिक सारखी गत | फक्त मान हलवायची | आणि त्याचा एंड result काय निघाला : मला वधू-वर मेळाव्यात न्यायचे ठरले | आता नाही म्हणाली असती तर माझी “all girls night out” प्रोब्लेम मधे पडली असती | आणि पप्पांनी हि गुपचूप सांगितला कि ते मला तिथून लवकर पळवतील , मग काय मी तयार १० मिनिटात | पप्पांचा आवडता ड्रेस घातला म्हंटल्यावर गाडीची चाबी न मागता माझ्या हातात 🙂 
 
मग आम्ही तिघे निघालो बोरिवलीच्या एका मेळाव्यात | It was my first so I had no clue what to even expect. पण तिथे मुली अश्या नटून थाटून आलेल्या कि मुलगा तयार असल्यास आजच लग्न करून मोकळे होतील 😉 (poor boys!!!! )
 
आम्हाला एका टेबल कडे बसवले गेलं अन मग सुरु झाले बघणं and all. मी टोटली spellbound होते , मम्मी जे म्हणायची करायची , atleast १० -१५ अनोळखी लोकांच्या  सहजा पाया पडले असेन , नशीब ती नवरात्र आणि गणपती ची सवय होती नाही तर माझा काही खरा नवतं | मुलं जास्त शिकली नवती पण attitude असा कि shahrukh khan ला हि लाज वाटेल huh..mannerisms नाही etiquettes नाही …urrrggghhhhh..छळन्या पेक्षा कमी नव्हता | मम्मीच्या मनाच्या शांती साठी ते हि केला, उद्याला तिला म्हणायला नको मी कमी पडले |
 
१ तसा नंतर तीच म्हणाली चला निघूया एवढा काही नाहीये इथे | घरी आलो अन गोगल गाय सारखी मम्मी स्वतःच्या रूम मधे गेली , तेव्हा वाटलं जी lady मान वर करून माझ्या कीर्ती बद्दल म्हणायची तिची काय अवस्था झालीये | असा हि वाटलं का मी मुलगा नाहीये पण तेवढ्यात पप्पांची थाप पाठी वर पडली आणि ते म्हणाले “बघ आपल्याआप घरी चालून येईन तुझ्यासाठी एक राजा|” पप्पा जे म्हणतात नेहमी खरं होतं पण तेव्हा वाटलं लवकर ये रे मम्मी-पप्पांची इच्छा आहे खूप वाट पहिली आता !!!!!!!
 
Image